लव्ह जिहादविरोधी कायदा होण्यासाठी आम्ही प्रयत्नरत !

भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची माहिती

भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे

नागपूर – लव्ह जिहादच्या विरोधात मी जनजागृती करत असून राज्यसभेचे खासदार म्हणून याविषयीचा कायदा होण्यासाठीही प्रयत्न करत आहे, अशी माहिती भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सामाजिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली. ‘आंतरधर्मीय लग्न करून कुणाची फसवणूक होऊ नये, हा मूळ उद्देश आहे’, असेही ते म्हणाले.