सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमुळे समाजाला झालेले लाभ

१. धार्मिक कृतींमागील शास्त्र समजणे आणि त्यावर श्रद्धा बसणे

‘समाजातील अनेक जणांना ‘आपल्या सर्व धार्मिक कृती किंवा धार्मिक विधी या अंधश्रद्धाच आहेत’, असे वाटते; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांमुळे त्यांना त्या धार्मिक कृतींमागील शास्त्र समजले आणि त्यांची त्यावर श्रद्धा बसली. आता पूर्ण श्रद्धेने धार्मिक कृती केल्याने त्यांना अनुभूती येत आहेत.

श्री. शशांक जोशी

२. अनेक जण सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमुळे योग्य पद्धतीने धार्मिक कृती आणि धार्मिक विधी करायला लागले आहेत.

३. वेगवेगळे सण आणि उत्सव यांमधील अपप्रकार न्यून झाले आहेत.

४. लोकांना नास्तिक बनवणार्‍या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’सारख्या संघटनांच्या अपप्रचाराला आळा बसला आहे.

५. धर्मावरील आघातांना मोठ्या प्रमाणावर आळा बसणे

धर्मावर होणार्‍या आघातांविषयी समाजातील सर्व लोक जागृत होत आहेत आणि ते या आघातांचा निषेध करू लागले आहेत. त्यामुळे धर्मावरील आघातांना मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे.

६. वरील सर्वच गोष्टींमुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’, या ध्येयाच्या दिशेने सर्व समाजाची वेगाने वाटचाल होत आहे.

‘गुरुदेव, आम्हाला सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या कृपेचा लाभ करून घेता येऊ दे. ‘साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’, हे आपले ध्येय लवकरात लवकर साध्य होऊ दे’, अशी आम्ही आपल्या चरणी अनन्यभावे प्रार्थना करतो.’

– श्री. शशांक जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.८.२०२२)