उन्ह्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागपूर येथे महापालिकेचा ‘हिट ॲक्शन प्लॅन’ !

१५ मार्चपासून शाळा सकाळी भरवणार  !

नागपूर – राज्यात हळूहळू उन्हाची तीव्रता वाढत आहे. येथील महानगरपालिकेने १५ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘हिट ॲक्शन प्लॅन’ सिद्ध केला आहे, असे आयुक्त बी. राधाकृष्णन् यांनी सांगितले.

हवामानशास्त्र विभागानुसार यंदाचे वर्ष ‘एल् निनो’ प्रभावित रहाणार आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा अधिकच तापणार असल्याचे संकेत दिसत आहेत. महापालिकेची सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वेक्षण करून उष्णतेची झळ पोचणार्‍या वस्त्यांमधील नागरिकांचा शोध घेऊन त्यानुसार नागपूर महानगरपालिकेकडून ‘ओ.आर्.एच्.’चा पुरवठा केला जाणार आहे.