भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या भावांकडून हत्या !

हरीश

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हरीश नावाच्या तरुणाची या तरुणीच्या भावांनी मंदिराजवळ चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या १० दिवसांपासून हरीश बेपत्ता होता. पोलिसांनी काही संशयितांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू आहे.

१. देवरकोंडा येथे रहाणारा हरीश ७ मासांपूर्वी भाग्यनगरच्या एल्लारेड्डीगुडा भागात रहाण्यास आला होता. तेथे त्याची ओळख मुसलमान तरुणशी झाली होती. त्यांच्यात प्रेम निर्माण झाले होते; मात्र तरुणीच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हते. तरुणीच्या भावांनी हरीश याला तिच्यापासून लांब रहाण्यास सांगितले होते आणि मारहाणही केली होती.

२. यानंतरही ते सामाजिक माध्यमांतून संपर्कात होते. १० दिवसांपूर्वी त्यांनी गुपचूप विवाह केला; मात्र ते वेगवेगळेच रहात होते. हरीशच्या कुटुंबियांना ‘तो कुठे रहात आहे ?’, हे ठाऊक नव्हते. दुसरीकडे मुसलमान तरुणीही बेपत्ता असल्याने तिच्या भावांनी शोध चालू केला होता. त्यांनी हरीशचा मित्र शिवा याचे अपहरण करून त्याच्याकडून हरीशची माहिती मिळवली.

३. तरुणीच्या भावांनना दुलपल्ली भागात हरीश असल्याचे समजल्यावर ते त्याला भेटण्यासाठी गेले. त्यांची तेथील अंजनेय स्वामी मंदिराजवळ भेट झाल्यावर तरुणीच्या भावांनी हरीशवर चाकूने वार करत त्याला भोसकले. या वेळी तरुणीही तेथे उपस्थित होती. तिच्या भावांनी तिला तेथून नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ५ जणांना कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका 

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात हिंदूंनी आवाज उठवल्यावर त्यांना ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे सांगणारे निधर्मीवादी आणि सुधारणावादी अशा घटनांनंतर मात्र लपून बसतात !