नगर – येथील रामवाडी परिसरात बजरंग दलाचे शहर संयोजक श्री. कुणाल भंडारी आणि श्री. अशोक लोंढे यांच्यावर २७ फेब्रुवारीला रात्री प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात कुणाल भंडारी हे घायाळ झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे, तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही संबंधितांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे. ‘धार्मिक स्थळावर चादर चढवणारा हाच तो मुलगा आहे’, असे म्हणून श्री. कुणाल भंडारी यांच्यावर जमावाने आक्रमण करून धारदार शस्त्राने त्यांना घायाळ केल्याचे समजते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात श्री. कुणाल भंडारी आणि श्री. अशोक लोंढे यांच्या भावाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नासीर शेख, अल्तमश शेख, सादीक शेख मौलाना, सलमान हिनु शेख, सलमान अस्लम शेख, जाकीर तांबोळी, अश्पाक शेख, अफझल शेख, सहेबान जहागीरदार या ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी ४ तरुणांना कह्यात घेतले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून संवेदनशील ठिकाणांवर पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आक्रमणाचे वृत्त समजताच शहरातील विविध पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्तेे यांनी रुग्णालय आणि तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली.
संपादकीय भूमिका
|