अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारची आतंकवाद्यांविरुद्ध मोहीम !

इस्लामिक स्टेटच्या एका प्रमुखाला ठार मारले !

काबूल – अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आतंकवाद्यांविरुद्ध मोहीम उघडली असून त्याअंर्तगत इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेच्या एका प्रमुखाला ठार मारण्यात आले. कारी फतेह असे ठार झालेल्या आतंकवाद्याचे नाव असून तो इस्लामिक स्टेटचा माजी युद्धमंत्री होता.


याविषयी माहिती देतांना तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाला की, इस्लामिक स्टेट ही संघटना तालिबानविरोधी आहे. तिने काबूलमध्ये रशिया, पाकिस्तान आणि चीन यांच्या राजकीय उद्दिष्टांना सुरूंग लावण्याचे काम केले आहे. त्याने अनेक मशिदींवरही आक्रमणांचे षड्यंत्र रचले होते.

संपादकीय भूमिका

तालिबान हीच मुळात कट्टर जिहादी आतंकवादी संघटना आहे. अशा तालिबानने आतंकवाद्यांविरुद्ध मोहीम उघडणे हे हास्यास्पद आणि निवळ दिखावा आहे ! वस्तूतः तालिबानसह सर्वच आतंकवाद्यांचा नाश होणे शांततेच्या दृष्टीने आवश्यक आहे !