आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी आणि आय.पी.एस्. अधिकारी रूपा यांचे अखेर स्थानांतर !

वैयक्तिक छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस्.) अधिकारी रूपा मौदगील यांनी आरोप केला आहे की, भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस्.) अधिकारी रोहिणी सिंधुरी यांनी अनेक पुरुष आय.ए.एस्. अधिकार्‍यांसमवेत तिचे वैयक्तिक छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले आहे. याविषयी शासनाला कळवण्यात आले असून सरकारने रोहिणी यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

१. या संदर्भात आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी सिंधुरी म्हणाल्या की, शिष्टाचारानुसार सरकारी अधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाऊ नये, त्यामुळे मी या आरोपांवर बोलले नाही. रूपा यांनी माझ्यावर अनेक बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यासंदर्भात मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे.

२. दोन महिला सरकारी अधिकार्‍यांमधील वाद सार्वजनिक झाल्यामुळे कर्नाटक सरकारने रूपा मौदगील आणि रोहिणी सिंधुरी यांचे कोणतेही पद न देता स्थानांतर केले आहे.