सनातनची आयुर्वेदाची औषधे
‘बहुतेक वेळा औषधांचे दर न्यून करण्यासाठी भेसळीचा मार्ग अवलंबला जातो. ही भेसळ सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही. भेसळीची काही उदाहरणे अशी आहेत. सुंठीचे चूर्ण करतांना त्यामध्ये पीठ मिसळले जाते. आवळा चूर्ण बनवतांना बियांसकट आवळा दळला जातो. ज्येष्ठमधाच्या हलक्या प्रतीच्या काड्यांपासून चूर्ण बनवले जाते.
याउलट सनातनची आयुर्वेदाची औषधे बनवतांना उत्तम गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सुंठीच्या चूर्णामध्ये पिठाची अजिबात भेसळ नाही. आवळ्याचे बी काढून केवळ गर वाळवून त्यापासून चूर्ण बनवले जाते. उत्तम प्रतीच्या ज्येष्ठमधापासून त्याचे चूर्ण बनवले आहे. अन्यही चूर्णांमध्ये उत्तम प्रतीचा कच्चा माल वापरला आहे. यामुळेच ‘सनातनच्या औषधी चूर्णांचा चांगला गुण येतो’, असा अनेकांचा अनुभव आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२३)