न्यूयॉर्क – अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांचे सरकार असून तेथे अल्-कायदा, तेहरिक-ए-तालिबान, इस्टर्न तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट आदी आतंकवादी संघटनांनी हात-पाय पसरले आहेत. तालिबानी सत्तेत आल्यामुळे तेथील ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेमुळे आतंकवादी मुक्त संचार करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट खुरासानचे ६ सहस्र आतंकवादी आहेत. ते अफगाणिस्तानच्या कुनार, नांगरहर, नुरीस्तान या प्रांतामध्ये सक्रीय आहेत. तालिबानी सत्तेत आल्यामुळे ‘अल् कायदा’सारख्या आतंकवादी संघटनांचे बळही वाढले आहे.
#UnitedNations | #Afghanistan remains primary source of terrorist threat for Central and South Asia, with groups such as ISIL-K, Al-Qaeda, Tehrik-e Taliban Pakistan enjoying greater freedom of movement: UN report#CentralAsia #SouthAsia #Terrorism https://t.co/5tGqJ6LFRZ
— The Indian Express (@IndianExpress) February 15, 2023