‘व्‍हॅलेंटाईन-डे’वर बहिष्‍कार घाला ! – हिंदु जनजागृती समिती

दोंडाईचा (जिल्‍हा धुळे) येथे तहसीलदार आणि महाविद्यालय येथे निवेदन !

 

दोंडाईचा (जिल्‍हा धुळे) – पाश्‍चात्‍यांनी व्‍यावसायिक लाभासाठी प्रेमाच्‍या नावाखाली मांडलेल्‍या ‘व्‍हॅलेंटाईन डे’ या विकृत संकल्‍पनेमुळे युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकता यांच्‍या गर्तेत ओढली जात आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्‍ये घडल्‍याच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत. या दिवशी होणार्‍या पार्ट्यांमधून युवक-युवती यांच्‍यात मद्यपान, धुम्रपान, अमली पदार्थाचे सेवन, संतती प्रतिबंधक साधनांच्‍या विक्री, भरधाव वाहने चालवणे आदी अपप्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. या वेळी हिंदु मुली ‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडू शकतात. यामुळे होणार्‍या घटनांचा अतिरिक्‍त ताण पोलीस आणि प्रशासन यांवरही येत आहे, त्‍यामुळे अनैतिकता आणि लव्‍ह जिहाद यांना प्रोत्‍साहन देणार्‍या पाश्‍चात्त्य ‘व्‍हॅलेंटाईन-डे’वर बहिष्‍कार घातला पाहिजे, अशा आशयाचे निवेदन याविषयीचे निवेदन दोंडाईचा येथील तहसीलदार आर्.एस.मोरे  आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना देण्‍यात आले. या वेळी धर्मप्रेमी प्रफुल्ल भोई, विशाल पाटील, चुडामन बोरसे, विशाल चौधरी, अजय भोई, जयेश ठाकरे, गोलू भोई आणि श्रीकांत भोई हे उपस्‍थित होते.