चित्रपट बनवतांना जनभावना जपणे महत्त्वाचे ! – योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

देहली – चित्रपट अभिनेते आणि कलाकार यांचा सन्मान करणे आवश्यक आहे; मात्र चित्रपट बनवतांना चित्रपट निर्मात्यांनी जनतेच्या भावनांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना पत्रकाराने त्यांना हिंदी चित्रपटांवर बहिष्कार घालण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याविषयी विचारले असता योगी आदित्यनाथ यांनी वरील उत्तर दिले.