हिंदूंना सुरक्षेविना काश्मीर खोर्‍यात काम करण्यासाठी भाग पाडणे, हा अमानुषपणा !

राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – पंतप्रधान महोदय, भारत जोडो यात्रेमध्ये काश्मिरी हिंदूंचे एक प्रतिनिधी मंडळ मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी त्यांची दुःखद परिस्थिती मला सांगितली. आतंकवाद्यांच्या रडारवर असलेल्या काश्मिरी हिंदूंना कोणत्याही सुरक्षेविना खोर्‍यात जाण्यास भाग पाडणे, हे अमानुष पाऊल आहे. तुम्ही या प्रकरणी योग्य ती पावले उचलाल, अशी आशा आहे, असे पत्र काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

राहुल गांधी यांनी यात पुढे म्हटले आहे की, हत्यांमुळे काश्मीर खोर्‍यात भीती आणि निराशा यांचे वातावरण आहे. काश्मीर खोर्‍यात कामगारांना कोणत्याही सुरक्षेविना कामावर परतायला सांगितले जात आहे, हा त्यांच्यासमवतेचा निर्दयीपणा आहे.

संपादकीय भूमिका

काश्मिरी हिंदूविषयी आता कळवळा असल्याचे दाखवणारे राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस यांनी काश्मिरीच्या हिंदूंसाठी आतापर्यंत काय केले ?, हेही सांगायला हवे !