काही दिवसांपूर्वी साकेगाव (जिल्हा जळगाव) येथील शहनाज अमीन भोईटे या महिलेच्या घरातून २१ सहस्र ७०० रुपयांच्या बनावट नोटा प्राप्त झाल्या होत्या. अन्वेषणामध्ये जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील हनिफ अहमद शरीफ देशमुख याचे नाव समोर आल्यानंतर त्याच्या घरातून २० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा, त्यासाठी वापरण्यात येणारा कागद (बाँड पेपर) आणि एक चारचाकी जप्त करण्यात आली. देशमुख हा प्रतिदिन २० ते २५ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा सिद्ध करत होता. तो गेल्या ३ मासांपासून एका खोलीत बनावट नोटा सिद्ध करून जिल्ह्यात वितरित करत होता. आतापर्यंत त्याने ४ लाख रुपये मूल्याच्या १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा वितरित केल्या आहेत. त्याने बनावट नोटा सिद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, स्कॅनर दुरुस्तीसाठी जळगाव येथे ठेवलेले होते, ते पोलिसांनी जप्त केले. हनिफ याचे शिक्षण केवळ १० वीपर्यंतच झालेले असल्याने यामागे अजून कुणाचा समावेश आहे का ? दोन्ही संशयितांचे भ्रमणध्वनी क्रमांक अन्यांच्या नावावर आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.
१९ मे २०२२ या दिवशी जिल्ह्यातील पहूर बसस्थानक परिसरात उमेश चुडामण चव्हाण नावाच्या २२ वर्षीय युवकाने स्वतः रंगीत प्रिंटर आणि बाँड पेपरच्या साहाय्याने बनावट नोटा सिद्ध केल्याची स्वीकृती दिली होती. त्याने ५ ते ७ सहस्र नोटा जामनेर तालुक्यात वितरित केल्याचे मान्य केले होते.
एखादा गुन्हा केल्यानंतर तात्काळ कठोर शिक्षा न मिळाल्याने अन्य गुन्हेगार त्याच प्रकारचा गुन्हा करण्यास सिद्ध होतात, हे पोलीस आणि न्याययंत्रणा अकार्यक्षम असल्याचे द्योतक आहे, असे कुणी म्हटल्यास त्यात वावगे काय ? गेल्या वर्षी पकडलेल्या गुन्हेगाराच्या विरोधात कठोर कारवाई झाली असती, तर पुढील गुन्हा टळला असता. अल्पसंख्य म्हणवले जाणारे धर्मांध मात्र राष्ट्रद्रोह, देशद्रोह करण्यात बहुसंख्य असल्याचे अनेक प्रकरणांतून सिद्ध झाले आहे. तरीही पोलीस प्रशासन त्यांच्या मुसक्या आवळत नाही, हे संतापजनक आहे. अशा प्रकारे बनावट चलन वापरात आणून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पहाणार्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे धाडस कुणाचे होणार नाही !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव