‘हिंदु राष्ट्रा’विषयी विधान केल्यावरून सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात याचिका  प्रविष्ट

नवी देहली – माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘सुदर्शन टीव्ही’वरील कार्यक्रमात हिंदु राष्ट्राची शपथ घेण्यावरून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती ‘सुदर्शन टीव्ही’ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी ट्वीट करून दिली.

या याचिकेत श्री. चव्हाणके यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात त्यांनी ‘हिंदु राष्ट्राची शपथ घेणे गुन्हा कसा?’ असा प्रश्‍न विचारला होता.