मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाने केली आत्महत्या !

तरुणीच्या कुटुंबियांकडून तरुणावर होता मुसलमान स्वीकारण्याचा दबाव !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमान तरुणी फरहा हिच्याशी विवाह करणार्‍या दुष्यंत चौधरी याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ३ वर्षांपूर्वी त्याने फरहा हिच्या कुटुंबियांचा विरोध असतांनाही तिच्याशी विवाह केला होता. तेव्हापासून तिच्या कुटुंबाकडून दुष्यंत यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. काही मासांपूर्वी फरहा माहेरी निघून गेली होती. तिला परत आणण्यासाठी दुष्यंत प्रयत्न करत होता; मात्र तिचे कुटुंबीय त्याला मुसलमान होण्यासाठी सांगत होते. त्यामुळे तो तणावात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी दुष्यंतच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून फरहा आणि तिचे कुटुंबीय यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु तरुण असो कि तरुणी दोघेही मुसलमानांच्या कथित प्रेमामध्ये अडकल्यास त्यांचा शेवट असाच होतो, हे लक्षात घ्या !