देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्या काँग्रेसची प्रवृत्ती कशी आहे ?, याचा अनुभव हिंदूंनी वेळोवेळी घेतला आहे. काँग्रेसची हिंदुद्वेषी वृत्ती सर्वज्ञात आहे. तथापि अलीकडच्या काळात विशेषतः वर्ष २०१४ मध्ये केंद्रातील सत्ता गेल्यापासून काँग्रेस तिच्या राष्ट्रघातकी वृत्तीचे दर्शन वेळोवेळी घडवत आहे. आताही काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ही राष्ट्रघातकी परंपरा कायम राखली. भारतीय सैन्याने वर्ष २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘लक्ष्यित आक्रमण’ (सर्जिकल स्ट्राईक) करून पाकला धडा शिकवला होता. याविषयी देशवासियांचा उर अभिमानाने भरून आला होता; परंतु तेव्हापासून काँग्रेसवाल्यांना मात्र पोटशूळ उठला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी सैन्याच्या या ‘लक्ष्यित आक्रमणा’चे पुरावे मागितले आहेत. आताही राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘भारत जोडो’ यात्रेत दिग्विजय सिंह यांनी ‘केंद्र सरकारने ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे कधीच दिले नाहीत’, असे राष्ट्रघातकी विधान केले. सिंह हे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही विधाने करण्यामध्ये नेहमी पुढे असतात. त्यांच्या बर्याच विधानांचा काँग्रेसला फटका बसला आहे. सिंह यांची भूमिका ही आतापर्यंत काँग्रेसचीही भूमिका होतीच. याच भूमिकेमुळे काँग्रेसला वर्ष २०१९ मधील निवडणुकीत अत्यंत नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. यातून सावरण्यासाठी आणि वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीची सिद्धता म्हणून राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली. या यात्रेचा सध्या अंतिम टप्पा चालू आहे. अशात सिंह यांनी हे विधान केल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची चांगलीच पंचाईत झाली. सिंह यांच्या या एका विधानामुळे गांधी यांच्या ३ मासांच्या प्रयत्नांवर पाणी फिरणार होते. त्यामुळे गांधी यांनी तडकाफडकी सिंह यांच्या विधानापासून फारकत घेत त्यांच्या विधानाशी असहमती दर्शवली. ‘आमचा आमच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. सैन्याने काही केले, तर पुरावे देण्याची आवश्यकता नाही’, असेही गांधी यांनी स्पष्ट केले. गांधी यांची ही सारवासारव स्वार्थासाठी आहे; कारण त्यांच्या लेखी ‘भारत जोडो’ यात्रेला देशात जो काही प्रतिसाद मिळाला आहे, त्यावर सिंह यांच्या एका वाक्याचा गंभीर परिणाम होऊ शकला असता. तसेच जनतेचा काँग्रेसवरचा उरलासुरला विश्वासही उडाला असता. केवळ या भीतीपोटीच गांधी यांनी सिंह यांच्या विधानाशी फारकत घेतली. तसे नसते, तर त्यांनी सिंह यांनी देशाचा अवमान केला; म्हणून त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केली असती; परंतु तसे झाले नाही. राहुल गांधी यांना राष्ट्रनिष्ठेपेक्षा पक्ष महत्त्वाचा वाटला. एकीकडे पक्षातील एक वरिष्ठ नेता ज्या भारतीय सैन्याविषयी, पर्यायाने भारताविषयी प्रश्न उपस्थित करतो, त्याच भारतात गांधी हे ‘भारत जोडो’ यात्रा काढतात, हा निवळ दिखावा आहे, हे सिद्ध होते. एकीकडे राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रा काढत असतांना दिग्विजय सिंह मात्र भारत तोडणारी विधाने करत आहेत, हा विरोधाभासही आहे. काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या, तरी तिची खरी मानसिकता दिग्विजय सिंह यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या विधानाच्या माध्यमांतून पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. त्यामुळे लोकांनीही आता ‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेतून काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवणेच आवश्यक आहे. यातच राष्ट्राचे हित आहे.
हिंदू जागृत होत आहेत !
कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पंचलिंगेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवात मुसलमानांकडून थाटण्यात आलेली दुकाने हटवण्यात आली. सध्या हे सूत्र ऐरणीवर आहे. गेल्या काही मासांपासून कर्नाटकमध्ये मंदिरांच्या जत्रांमध्ये मुसलमानांच्या दुकाने थाटण्यावर बहिष्कार घालण्याची चळवळ हिंदु संघटनांकडून राबवली जात आहे. या संदर्भात मंदिरांच्या ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत बिळात लपून बसलेले पुरो(अधो)गामी बाहेर पडतील आणि हिंदुविरोधी गरळओक चालू करतील. कर्नाटकच काय; पण देशभरात धर्मांधांकडून हिंदूंच्या विरोधात लव्ह जिहाद, धर्मांतर, दंगली आदी षड्यंत्र रचले जात आहे. येनकेनप्रकारेण हिंदूंना जेरीस आणण्याचे कारस्थान चालू आहे. त्याचाच परिणाम म्हणून हिंदू त्यांच्या मंदिरांच्या जत्रांच्या ठिकाणी मुसलमानांना दुकाने थाटण्यास विरोध करत आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय ? ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना रशिदी यांनी ‘महंमद गझनी याने सोमनाथ मंदिर पाडून कोणतीही चूक केली नाही’, असे विधान करून मंदिर पाडणे योग्य ठरवले होते. यावरून त्यांची मंदिरांकडे पहाण्याची दृष्टी लक्षात येते. हिंदूंच्या मंदिरांच्या जत्रोत्सवात दुकाने थाटणार्यांनी कधी मौलाना रशिदी यांच्यासारख्यांच्या विधानांचा साधा निषेध तरी केला आहे का ? मग त्यांना मंदिरांच्या जत्रोत्सवात दुकाने थाटण्याचा काय अधिकार ? दुसरे म्हणजे इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. मग ज्या ठिकाणी मूर्तीपूजा केली जाते, अशा मंदिरांच्या परिसरात मुसलमान दुकाने का थाटतात ? त्यांना त्यांचे मुसलमान धर्मगुरु असे करण्यापासून रोखत का नाहीत ? यावरून ‘तुमचा धर्म नको; पण त्या धर्माच्या धार्मिक ठिकाणी मिळणारा पैसा मात्र हवा’, अशी त्यांची प्रवृत्ती दिसून येते.
पंचलिंगेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवातील मुसलमानांनी थाटलेल्या दुकानांवर विश्व हिंदु परिषदेने आक्षेप घेतला होता. त्यांनी जागृतीसाठी भित्तीपत्रके लावली होती. त्यात त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या कुकर स्फोटाचा उल्लेख करत ‘या स्फोटाचे लक्ष्य काद्री मंजुनाथ मंदिर होते’, याची हिंदूंना आठवण करून दिली होती. यावरून महंमद गझनीचे समर्थन करणार्या प्रवृत्ती प्रत्यक्षातसुद्धा त्याची हिंदुद्वेषी परंपरा पुढे नेटाने रेटत आहेत, हेच स्पष्ट होते. त्यामुळे अशांना विरोध होतो, यात आश्चर्य ते काय ? हिंदुविरोधी षड्यंत्र यापुढेही चालू राहिले, तर कर्नाटकची आवृत्ती संपूर्ण देशात पहायला मिळाल्याविना रहाणार नाही !