असुरक्षित पोलीस !

(प्रतिकात्मक चित्र) पोलिसांनी काढली रस्त्यातून धिंड !

पहूर (जिल्‍हा जळगाव) हे जळगाव-संभाजीनगर महामार्गावरील बाजारपेठेचे गाव आहे. येथून प्रतिदिन मुंबई, पुणे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्‍याची वाहतूक केली जाते. येथे १४ जानेवारीला रात्री १० वाजता दोन पोलिसांनी ‘दुचाकी बाजूला घे’, असे सांगितले असता फिरोज शेख आणि ख्‍वाजा तडवी यांनी पोलिसांवरच आक्रमण करून दोन्‍ही पोलीस कर्मचार्‍यांना घायाळ केले. त्‍यानंतर दोन्‍ही आरोपी पसार झाले. आरोपींच्‍या विरोधात पहूर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला.

या घटनेस पहूर बसस्‍थानक परिसरातील अवैध अतिक्रमण कारणीभूत ठरले; म्‍हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी १५ जानेवारीला त्‍या परिसरातील सर्व अवैध अतिक्रमणे, तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्‍शा, काळ्‍या-पिवळ्‍या चारचाकी चालकांच्‍या विरोधात कारवाई करत परिसर वाहतुकीसाठी मोकळा केला. या कारवाईच्‍या काळात वरील दोन्‍ही आरोपी बीड जिल्‍ह्यातील परळीच्‍या जंगलात असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथेही या आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली. आरोपी ख्‍वाजा तडवी याने तर पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे यांचे पिस्‍तूल हिसकावण्‍याचा प्रयत्न केला. दोघांना पोलिसांनी कह्यात घेऊन त्‍यांची बसस्‍थानक परिसर ते पोलीस ठाण्‍यापर्यंत धिंड काढली.

एकूणच सर्व प्रसंग पाहिल्‍यास धर्मांधांना जनतेने नव्‍हे, तर पोलिसांनीही काही बोलायची सोय राहिली नाही. हे धर्मांध पोलिसांवर हात उगारण्‍याचे धाडस कुणाच्‍या जोरावर करतात, हे पहायला हवे. या उद्दाम धर्मांधांना वेळीच न रोखल्‍याने सामान्‍य जनतेचे जगणे कठीण होत आहे, हे वेगळे सांगायला नको. संख्‍येने एक-दोन असणारे धर्मांध पोलिसांना मारहाण करतात, पोलिसांच्‍या तावडीतून पसार होतात आणि पुन्‍हा सापडल्‍यानंतरही पोलिसांवर आक्रमण करण्‍याचा प्रयत्न करतात, ही सर्व परिस्‍थिती पाहिल्‍यास धर्मांधांच्‍या पुढे पोलीस यंत्रणा कमकुवत आहे, असे कुणाला वाटल्‍यास चुकीचे काय ? असे असेल, तर शेकडोंच्‍या संख्‍येने धर्मांधांचा जमाव आल्‍यास त्‍याला पोलीस यंत्रणा सक्षमपणे तोंड देईल का ? हा प्रश्‍न आहे.

अनेकदा अतिक्रमण करण्‍यातही धर्मांध पुढे असतात. ‘अतिक्रमण करणे चुकीचे आहे’, हे ठाऊक असूनही आणि भर रस्‍त्‍यात अतिक्रमण होत असतांनाही प्रशासन त्‍याची वेळीच नोंद घेत नाही, हेही अनाकलनीय आहे. एकूणच असुरक्षित पोलीस ही भारतासाठी धोक्‍याची घंटा आहे, हे नक्‍की !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव