आई-वडील हेच आद्य दैवत त्यांची सेवा करा !

महर्षि मार्कंडेय यांचा संदेश

महर्षि मार्कंडेय

सोलापूर – केवळ १६ वर्षांचे आयुष्य घेऊन जन्माला आलेले महर्षि मार्कंडेय यांनी आई-वडील यांनाच आद्य दैवत मानले होते. मृत्यूची घटिका समीप आल्यानंतर दु:खी आई आणि वडील यांची चिंता दूर करण्यासाठी त्यांनी शिवआराधना चालू केली. त्यानंतर मृत्यूवरही विजय मिळवला. पुढे महर्षि मार्कंडेय यांनी ‘दुर्गासप्तशती’ लिहून सर्व शक्तीपीठांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांच्या चरित्रातून एकच संदेश मिळतो, ‘आई आणि वडील यांची मनापासून सेवा केल्यास कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाल.’ त्यामुळे आई-वडील यांचे मन कधीही दुखवू नका. त्यांची सेवा करा. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला पुढे घेऊन जाणारा असतो, असा संदेश पंडित वेणूगोपाल जिल्ला (पंतुलु) यांनी महर्षि मार्कंडेय यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दिला आहे.