मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी कु. निकिता झरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. प्रेमभाव : ‘कु. निकिताताईला सेवेविषयी विचारल्यावर ती ‘सेवा कोणती आणि कशी करायची ?’, हे पुष्कळ प्रेमाने अन् आपुलकीने सांगत होती.
२. उत्तम नियोजनकौशल्य : ताई ‘कोणती भाजी आधी स्वच्छ करायची ? कोणती चिरायची ? ती कशा पद्धतीने चिरायची ?’, याचे नियोजन पुष्कळ चांगल्या पद्धतीने करते. त्यामुळे तिला सेवा विचारतांना मला आनंद होत असे.
३. चांगली निरीक्षणक्षमता : तिचे ‘कोणते साधक कोणती सेवा कशी करतात ?’, याचे निरीक्षण चांगले आहे. ती प्रत्येक साधकाचे नाव घेऊन त्यांना सेवा सांगते.
४. सतर्कता : ताईची सतर्कता चांगली आहे. तिने मला सांगितलेल्या सर्व सेवा माझ्याकडून वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्या, तसेच मला सेवेतून आनंदही मिळाला.
५. ताईकडे पाहिल्यावर माझा सेवा करण्याचा उत्साह वाढतो. तिचे स्मितहास्य पुष्कळ सुंदर आहे.
‘हे गुरुमाऊली आणि श्रीकृष्णा, या सेवेच्या माध्यमातून निकिता ताईकडून मला जे शिकता आले, ते माझ्या कृतीत येऊन मला गुरुचरणी अखंड रहाता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. सुनिता वनारसे, सातारा (२३.६.२०२२)