राखी सावंत हिला मुसलमानाशी विवाह केल्याने इस्लाम स्वीकारावा लागला ! – तस्लिमा नसरीन

तस्लिमा नसरीन : राखी सावंत हिला इस्लाम स्वीकारावा लागला ! –

नवी देहली – अभिनेत्री राखी सावंत हिने आदिल दुर्रानी या मुसलमान व्यक्तीशी विवाह केल्याची माहिती तिने स्वतः सार्वजनिक केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही याविषयी एक ट्वीट केले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे, ‘राखी सावंत हिलाही इस्लाम धर्म स्वीकारावा लागला; कारण तिने एका मुसलमान व्यक्तीशी निकाह केला. इतर धर्मांप्रमाणेच इस्लामचाही विकास झाला पाहिजे. मुसलमान आणि मुसलमानेतर यांनीही विवाह स्वीकारले पाहिजे.’