भाषेची टिंगलटवाळी टाळा ! – ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार

ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार

पुणे – भाषा लवचिक असेल, तरच तिचा प्रसार होतो. त्‍यासाठी बोलीभाषेच्‍या प्रसाराला वाव द्यायला हवा. भाषेच्‍या संदर्भातील टिंगलटवाळी टाळली पाहिजे, अशी अपेक्षा ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी व्‍यक्‍त केली. जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापिठाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या ‘शोध मराठी मनाचा’ या १८ व्‍या जागतिक मराठी संमेलनाचे उद़्‍घाटन पवार यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍या वेळी ते बोलत होते. दर १० मैलावर पाणी आणि वाणी बदलते; पण बोलीभाषेचा संसार भाषेच्‍या सौंदर्यात भरच घालतो, असे पवार यांनी सांगितले.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या मराठी भाषा विभागाने वरळीमधील सरदार वल्लभभाई पटेल स्‍टेडियम, एन्.एस्.सी.आय. डोम येथे आयोजित केलेल्‍या ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्‍व मराठी संमेलनासाठी मराठी भाषेच्‍या संवर्धनासाठी काम करणार्‍या विविध संघटनांना आमंत्रित केले होते; मात्र संमेलनाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.