अजित पवार यांचे वक्तव्य त्यांना शोभणारे नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

विरोधी पक्षनेते अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – धर्मवीर संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलीदान केले. औरंगजेबाने संभाजी महाराज यांचे हाल केले. त्यांच्या डोळ्यांत गरम सळ्या घुसवल्या. शरिराची त्वचा सोलली. धर्मांतरासाठी बळजोरी करूनही धर्मवीर संभाजीराजे यांनी हिंदु धर्म सोडला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी केलेले वक्तव्य त्यांना शोभणारे नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘धर्मवीर संभाजी महाराज यांनी धर्मासाठी केलेला त्याग कुणीही विसरू शकत नाही. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला जनताच उत्तर देईल. काही जण औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत. औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिर पाडले. हिंदूंच्या माता-भगिनींवर अत्याचार केले. धर्मवीर संभाजी राजांचा छळ केला, असे असतांना औरंगजेबाचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण चालू आहे. समस्त शिवप्रेमी जनता याला उत्तर देईल.’’