साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
‘देवपूजेमध्ये वापरण्यात येणारे वस्त्र उदा. देव पुसायचे कापड, देवघरात देवतांना आसन म्हणून वापरलेले कापड ही नेहमीच्या कपड्यांच्या समवेत धुवू नयेत. ती नेहमी स्वतंत्र धुवावीत. देवतांसाठी वापरलेली कापडे ही देवपूजेमुळे सात्त्विक झालेली असतात. ती आपल्या नेहमीच्या कपड्यांसमवेत धुतल्यास आपल्या कपड्यांतील रज-तमामुळे त्या कपड्यांची सात्त्विकता अल्प होते. हाच भाग संतांच्या कपड्यांच्या संदर्भातही होतो. त्यामुळे संतांचे कपडेही निराळे धुवावेत.
वाचकांनीही ही चौकट वाचून वरीलप्रमाणे कृती अवश्य करावी, त्याचसमवेत इतरांचे प्रबोधनही करावे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१५.१२.२०२२)