इराणमध्ये प्रसिद्ध लेखक मेहदी बहमन यांना फाशीची शिक्षा

इस्रायलच्या वृत्तवाहिनीवरून इराण सरकारवर केली होती टीका !

इराणमध्ये प्रसिद्ध लेखक मेहदी बहमन

तेहरान (इराण) – इराणमधील प्रसिद्ध लेखक मेहदी बहमन यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मेहदी बहमन यांनी इस्रायलच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी इराण सरकारवर टीका केली होती. त्यांनी इराणमध्ये इस्लामी कायदा लागू करण्याचा निषेध केला होता. तसेच इस्रायल आणि इराण यांच्यातील  द्विपक्षीय संबंध सुधारण्यावरही जोर दिला होता. या मुलाखतीनंतर तत्काळ बहमन यांना अटक करण्यात आली होती. इराणने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला होता.

मेहदी बहमन यांना ज्या मुलाखतीसाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, ती मुलाखत त्यांनी हिजाबविरोधी निदर्शने चालू होण्यापूर्वी म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये दिली होती.