जलतरण तलावात पोहणार्‍या अश्‍वेत मुलांना श्‍वेतवर्णीयांकडून मारहाण

दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषी घटना !

प्रिटोरिया (दक्षिण आफ्रिका) – येथे श्‍वेतवर्णीयांसाठी बनवलेल्या एका जलतरण तलावात २ अश्‍वेतवर्णीय मुले पोहतांना आढळल्याने त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

स्थानिक वृत्तसंकेतस्थळानुसार अश्‍वेत कुटुंब नाताळची सुटी साजरी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या फ्री स्टेटमधील मॅसेलस्पोर्ट रिसॉर्टमध्ये गेले होते. तेजथे काही श्‍वेतवर्णीय पुरुषांनी या कुटुंबातील १३ आणि १८ वर्षीय अश्‍वेत मुलांना येथील जलतरण तलावात पोहत असल्यावरून मारहाण आणि शिवीगाळ केली. याविषयीची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर आरोपी पळून गेले.

संपादकीय भूमिका

अशा घटनांविषयी अमेरिका, तसेच युरोपमधील देश, त्यांच्या मानवाधिकार संघटना कधी तोंड उघडतांना दिसत नाहीत; मात्र भारतात अल्पसंख्यांकांवर न होणार्‍या अत्याचारांवरून हिंदूंना लक्ष्य करण्यात पुढे असतात !