बाडमेर (राजस्थान) येथे हिंदु धर्मग्रंथांची पाने फाडून जाळल्याच्या प्रकरणी ३ जणांना अटक

हिंदु संघटना निदर्शने करीत असताना

बाडमेर (राजस्थान) – येथे नाताळच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा देणार्‍या काही जणांनी हिंदु धर्मग्रंथांची पाने फाडून ती जाळल्याची, तसेच या वेळेला हिंदु धर्माच्या विरोधात आपेक्षार्ह भाषणबाजी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. ही घटना बाखासर गावात घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर हिंदु संघटनांनी निदर्शने केली आणि पोलीस अन् जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल्यावर कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा नेहमीच अवमान होत असतो आणि हिंदूंवर आक्रमण होत असतात. हे लक्षात घेऊन अशा सरकारला घरी बसवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !