२१ ते २७ डिसेंबर या ७ दिवसांमध्ये गुरु गोविंदसिंह यांचे संपूर्ण कुटुंब हुतात्मा झाले होते. त्याच रात्री गुरु गोविंदसिंह यांची माता गुजरी हिनेही थंड्या बुरुजामध्ये प्राणत्याग केला. भारताच्या इतिहासात हा आठवडा ‘शोक सप्ताह’ आणि ‘शौर्य सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
पुसाचा (पौष) १३ वा दिवस. नवाब वजीत खां याने गुरु गोविंदसिंह यांचा मुलगा जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांना परत विचारले, ‘‘सांगा, इस्लामचा स्वीकार करत आहात का ?’’ ६ वर्षांचा लहान मुलगा फतेह सिंहने नवाबाला विचारले, ‘‘मुसलमान झालो, तर परत कधीच मरणार नाही ना ?’’
वजीर खां आश्चर्यचकित झाला. त्याच्या तोंडून उत्तर आले नाही; म्हणून मुलानेच उत्तर दिले, ‘‘मुसलमान होऊन मरायचेच आहे, तर आपल्याच धर्मात आपल्याच धर्मासाठी का मरू नये ?’’ नवाब वजीत खां याने दोन्ही मुलांना (जोरावर सिंह आणि फतेह सिंह) भिंतीत जिवंतपणी पुरण्याचा आदेश दिला. भिंत बांधणे चालू झाले. जेव्हा भिंत ६ वर्षांच्या फतेह सिंहच्या मानेपर्यंत आली, तेव्हा ८ वर्षांचा जोरावर सिंह रडू लागला. फतेह सिंहने विचारले, ‘‘जोरावर, का रडत आहेस ?’’ जोरावर म्हणाला, ‘‘मी यासाठी रडत आहे की, मी आधी आलो होतो; परंतु धर्मासाठी पहिले बलीदान तर तुझे होत आहे.’’ गुरु साहेबांचे संपूर्ण कुटुंब ६ ते १३ पूस या एका आठवड्यात राष्ट्र आणि धर्म यांसाठी हुतात्मा झाले. गुरु गोविंदसिंह यांचा मुलगा अजित सिंह आणि जुझार सिंह हेही यापूर्वी झालेल्या एका युद्धात हुतात्मा झाले होते.
पूर्वी पंजाबमध्ये ‘शौर्य सप्ताहा’च्या दिवसांमध्ये शीख भूमीवर झोपत होते; कारण नवाब वजीर खां याच्या अटकेत असतांना माता गुजरी हिने २५ डिसेंबरची ती रात्र फतेह सिंह आणि जोरावर सिंह यांच्या समवेत सरहिंदच्या किल्ल्यात थंड्या बुरुजामध्ये काढली होती. त्यानंतर २६ डिसेंबर या दिवशी दोन्ही मुले हुतात्मा झाली. २७ डिसेंबरला माता गुजरी यांनीही प्राणत्याग केला होता.
या सर्व ज्ञात-अज्ञात महावीर हुतात्म्यांचे स्मरण करा, ज्यांच्यामुळे आज सनातन संस्कृती जिवंत आहे.
(साभार : सामाजिक माध्यम)