झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात इम्रान अलीच्या घरातून ५०० किलो गोमांस जप्त

(प्रतिकात्मक छायाचित्र)

रांची – झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात गोहत्येचे प्रकरण समोर आले आहे. जमशेदपूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या हल्दीपोखर गावात गोहत्या होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी इम्रान अलीच्या घरावर छापा टाकला. गायींची हत्या करून गोमांस विकल्याप्रकरणी पोलिसांनी इम्रान अली आणि त्याचा साथीदार शमीम यांना अटक केली. इम्रान अली याच्या घरातून ५०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. हे मांस विकत घेणार्‍या ३ ग्राहकांनाही पोलिसांनी अटक केली. या पोलीस  कारवाईत १७ गायींची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी ‘झारखंड गोवंश हत्या प्रतिबंध कायदा, २००५’च्या अंतर्गत आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कारवाईत सुटका करण्यात आलेल्या १७ गायी गोशाळेच्या अधिकार्‍यांकडे सुपुर्द करण्यात आल्या.