देवा, शरणागत जिवा चरणी घे आता ।

‘मी’, ‘माझे’, ‘मला’ अशा प्रकारच्या अहंच्या विचारात गुरफटून कृती करणार्‍या माझ्या अहंभावी मनाला जाणीव करून देण्यासाठी मला काही ओळी सुचल्या.

सौ. स्वाती शिंदे

देवानेच दिधला गुरुसेवेसाठी हा देह ।
मला कशाला हवा त्याचा मोह ।। १ ।।

कार्य देहाचे चालवी तोच ।
तरीही वाटे मज, ‘करते सारे मीच’ ।। २ ।।

देव असे प्रीतीचा सागर ।
माझ्याकडे मात्र कर्तेपणाचा डोंगर ।। ३ ।।

देवा, गळो आता सत्वर अहंभाव हा ।
शरणागत जिवा चरणी घे आता’ ।। ४ ।।

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक