बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार !

कोलकाता – ‘झेड बांगला’ या मनोरंजन वाहिनीवर दाखवल्या जाणारी भारतीय बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा उघडपणे प्रचार केला जात आहे. ही मालिका बांगलादेशमध्येही प्रसारित केली जाते. या मालिकेत हिंदु मुलीचे मुसलमान  मुलासोबत लग्नाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘बंगालमधील हिंदूंनी या मालिकेचा निषेध केल्याचे आढळून आले नाही’, असे ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादला उघड प्रोत्साहन देणार्‍या अशा मालिकांना वैधपणे विरोध करून त्या बंद पाडण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक !