केरळमधील साम्यवादी सरकारचा पुरुषार्थ आता कुठे गेला ?

केरळमध्ये साम्यवादाचा पुरस्कार करणारे सरकार राज्य करत आहे. साम्यवादाला मानवतेचा पुळका आहे. ‘सर्वांना संपत्तीचा समान वाटा मिळाला पाहिजे, सर्वांना समान अधिकार प्राप्त झाला पाहिजे, सर्वांना समान स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे, समाजात कोणताही भेदाभेद असता कामा नये’, अशी विचारसरणी जर कुणाची असेल, तर ती त्याज्य ठरत नाही. असा आग्रह कुणी केला, तरीसुद्धा तो अयोग्य ठरत नाही. तथापि साम्यवादाचा पुरस्कार करणारे लोक नेहमीच हिंदूंच्या पुढे आपला पुरुषार्थ दाखवत असतात. हिंदु समाजाच्या व्यतिरिक्त असलेल्या समाजासमोर मात्र ते नांगी टाकतात. याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. त्यामुळे त्यांच्या साम्यवादाच्या तत्त्वज्ञानात हिंदु समाजाची गणती होत नाही.

नुकतेच केरळ सरकारच्या वतीने गरिबी निर्मूलनासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘कुडुंबश्री’ योजनेशी ‘संबंधित ‘मुलगा आणि मुलगी समानते’च्या शपथेवरून वाद निर्माण झाला. सरकारकडून या योजनेच्या अंतर्गत स्वयंसेवी साहाय्य गटांनी त्यांच्या स्वयंसेवकांना ‘मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार द्या. मुलामुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार देऊ’, अशी शपथ घेण्याचे निर्देश दिले होते. एक मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आणि ‘समस्थ केरळ जाम-इयुतुल कुत्बा कमिटी’ यांनी ही शपथ शरीयत कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत विरोध दर्शवला. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख…

१. ‘हिंदु धर्माचा अभिमान बाळगणे, म्हणजे रानटीपणा’ असा अपप्रचार साम्यवाद्यांनी करणे

‘हिंदु समाजाने त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला विरोध करता कामा नये’, या सिद्धांतावर साम्यवादाचा डोलारा उभा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही; कारण हिंदूंच्या भावना आणि श्रद्धास्थाने यांना काडीचेही मूल्य साम्यवादाचे पुरस्कर्ते देत नाहीत. ‘हिंदु धर्माचा अभिमान बाळगणे, म्हणजे रानटीपणा आहे’, असा अपप्रचार साम्यवादी मंडळी करतात.

२. साम्यवादाचा पुरस्कार करणार्‍या तथाकथित विद्वानांनी सर्वश्रेष्ठ हिंदु धर्माला विषवल्ली मानणे

वास्तविक पहाता हिंदु धर्म हा सर्वांत श्रेष्ठ असा धर्म आहे. जगातील एकमेव धर्म असा आहे की, जो द्वेषभावना ठेवत नाही. हिंदु धर्मात क्रौर्याला जागा नाही. तो हिंसेचा पुरस्कार करत नाही. त्यासह अहिंसेचे टोक गाठत नाही. हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान चराचरांतील सृष्टीकडे समदृष्टीने पहाण्याची शिकवण देते. न्याय, नैतिकता आणि सत्य या तत्त्वांवर मानवी समाजाची उभारणी करणारा हिंदु धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे. खलप्रवृत्ती समोर माघार न घेण्याची शिकवण देणारा, शौर्याचे कौतुक करणारा आणि क्रौर्याची नांगी ठेचणारा हिंदु धर्म आहे. त्यामुळे हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानात विसंगती आढळत नाही. म्हणून वैचारिक गोंधळ होण्याची शक्यता अजिबात रहात नाही. हिंदु धर्मात दांभिकतेला कुठेही वाव आणि स्थान नाही. असे असूनही साम्यवादाचा पुरस्कार करणारे तथाकथित विद्वान हिंदु धर्माला विषवल्ली मानतात.

श्री. दुर्गेश परुळकर

३. इस्लाम धर्माची शिकवण अन्याय, अत्याचार करणारी आणि मानवता यांना छेद देणारी असणे

वास्तविक पहाता ‘इस्लाम धर्म हा मानवतेचे शिक्षण देणारा आहे’, असे म्हणता येत नाही. इस्लाम धर्माची शिकवण अन्याय आणि अत्याचार यांच्या पायावर उभी आहे. लबाडी, विश्वासघात अशा विकृतींना पाठबळ देण्याचे काम इस्लाम धर्म करतो. जगात असलेल्या सर्व इस्लामी आतंकवादी संघटना इस्लाम धर्माची शिकवण उजळ माथ्याने आचरणात आणतात की, जी शांतता, सुव्यवस्था, मानवता यांना छेद देणारी आहे. ‘इस्लाम आणि त्याच्या धर्मग्रंथावाचून जगात अन्य कोणतेही धर्म आणि धर्मग्रंथ आदरणीय वा वंदनीय नाहीत’, अशी टोकाची आणि एककल्ली भूमिका घेणारा हा धर्म आहे.

४. ‘शत्रू राज्य इस्लामी राज्यात रूपांतर करणे, हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे’, असे शिकवणारा इस्लाम धर्म !

‘इस्लाम धर्माचा स्वीकार करा अन्यथा मृत्यूला सामोरे जा’, असे दोनच पर्याय मुसलमानेतर समाजासमोर ठेवणारा हा धर्म ‘मानवता आणि समानता यांचा कैवारी आहे’, असे म्हणता येत नाही. ‘ज्या देशात इस्लामेतरांचे राज्य आहे, ते राज्य इस्लाम धर्मियांच्या दृष्टीने शत्रू राज्य आहे. अशा शत्रू राज्याचे इस्लामी राज्यात रूपांतर करणे, हे प्रत्येक मुसलमानाचे धार्मिक कर्तव्य आहे’, अशी शिकवण देणारा धर्म मानवतेचा आहे, असे म्हणण्यास बुद्धी सिद्ध होत नाही.

५. साम्यवादी विचारसरणी ही अमृताला विष आणि विषाला अमृत मानणारी !

हिंदु धर्मात अशा प्रकारची कोणतीही शिकवण देण्यात आलेली नाही. ही गोष्ट साम्यवादाचा पुरस्कार करणार्‍यांनी दुर्लक्षित केली आहे. थोडक्यात साम्यवादी विचारसरणी ही अमृताला विष मानते आणि विषाला अमृत मानते. अशा विचारसरणीचा स्वीकार करणारे विद्वान आहेत, असे म्हणता येत नाही.

६. ‘समस्थ केरळ जाम-इयुतुल कुत्बा कमिटी’ने ‘कुडुंबश्री’ योजनेच्या अंतर्गत घेण्यात येणार्‍या समान अधिकाराच्या शपथेला विरोध करणे

केरळ सरकारच्या वतीने गरिबी दूर करण्यासाठी ‘कुडुंबश्री’ नावाची योजना राबवली जात आहे. या योजनेनुसार मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना समान मानून दोघांनाही संपत्तीमध्ये समान अधिकार देण्याची शपथ स्वयंसेवी गट घेतो. अशी शपथ घेणे, हे घटनाबाह्य नाही. उलट अशा प्रकारची शपथ घेऊन देशात समानता आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे घटनेचा आदर राखणे आणि घटनेचा सन्मान करणे होय.

असे असतांना केरळमधील ‘समस्थ केरळ जाम-इयुतुल कुत्बा कमिटी’ या मुसलमानांच्या संघटनेने ‘कुडुंबश्री योजने’ला विरोध केला आहे. या कमिटीच्या मते ‘या योजनेला पाठिंबा देऊन मुलामुलींना संपत्तीचा समान अधिकार देण्याची शपथ घेणे म्हणजे केंद्र सरकारला समान नागरी कायदा लागू करण्यासाठी साहाय्य करणे आहे.’ हे कारण सांगून कमिटीने केरळ सरकारवर दबाव आणला. मुसलमानांच्या या दबावापुढे केरळमधील साम्यवादी सरकार झुकले. ‘‘कुडुंबश्री योजने’साठी घेतली जाणारी शपथ कुराणच्या चौकटीच्या बाहेरची आहे. त्यामुळे तशी शपथ घेता येणार नाही’, असे या कमिटीचे म्हणणे आहे.

७. राज्यघटनेतील समानतेच्या सूत्राला विरोध करणार्‍यांना साम्यवादी सरकारने जाब का विचारला नाही ?

हिंदुस्थान हा निधर्मी देश आहे. ‘राज्यघटना ही सर्वांत श्रेष्ठ असून निधर्मी राज्यपद्धतीनुसार कुणालाही त्यांच्या धर्मातील मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन तिची पायमल्ली करता येणार नाही’, असे साम्यवादी सरकारने विरोध करणार्‍यांना ठणकावून का सांगितले नाही ? राष्ट्राच्या हिताचा विचार करून हिंदूंनी कोणतीही गोष्ट केली, तरीसुद्धा हिंदुस्थानातील लोकशाही आणि राज्यघटना सारेच धोक्यात आलेले असते. मुसलमानांचा हा निर्णय राज्यघटनेची पायमल्ली करत असूनही केरळमधील साम्यवादी सरकार त्यांच्यापुढे झुकले. आता त्यांचा पुरुषार्थ कुठे गेला ? आता त्यांनी ‘राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे’, असा गळा का काढला नाही ? साध्या साध्या गोष्टीवरून हिंदूंना कायम विरोध करणारे आता मूग गिळून का बसले ? आता त्यांची साम्यवादी दृष्टी अंध झाली आहे का ? आता ते एकाच वेळी मुके आणि बहिरे झाले आहेत का ? आता त्यांची विवेकशक्ती गोठून गेली आहे का ? आता त्यांना देशाच्या सार्वभौमत्वाची चिंता वाटत नाही का ?  देशातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात येत नाही का ? मानवी हक्कांचा भंग होत नाही का ? यांपैकी एकातरी प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी साम्यवादी विचारवंतांनी तोंड उघडावे, ही  अपेक्षा !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.(१५.१२.२०२२)