‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा !

हिंदु जनजागृती समितीचे आमदारांना निवेदन

बेळगाव येथील भाजपचे आमदार अभय पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

बेळगाव – हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र अन् कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव दक्षिणचे भाजपचे आमदार अभय पाटील आणि उत्तर बेळगावचे भाजपचे आमदार अधिवक्ता अनिल बेनके यांना देण्यात आले. दोघांनीही ‘हा विषय येत्या अधिवेशनात घेऊ’, असे सांगितले.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर, श्री. भारत पाटील, सौ. सविता गणेशन्, सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) नम्रता कुट्रे, श्रीमती कंग्राळकर, ‘जय तुळजाभवानी महिला मंडळा’च्या सौ. अर्चना पाटील, सौ. सुमंगला कणेरी आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. मारुति सुतार उपस्थित होते.