‘परात्पर गुरु डॉ. आठवले सेवेच्या ठिकाणी आहेत’, असा भाव ठेवल्यास सेवेचे ठिकाण रामनाथी आश्रमाप्रमाणे होऊ शकणे

‘काही दिवसांपूर्वी मी एका सेवेनिमित्त काही साधकांच्या समवेत नागेशी (फोंडा, गोवा) येथे गेलो होतो. तेथील एक साधिका मला म्हणाली, ‘‘दादा, ‘मला रामनाथीला कधी एकदा जाते’, असे झाले आहे.’’ मी तिला विचारले, ‘‘तू रामनाथीला कशाला जाणार आहेस ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला रामनाथीला सेवा करायला पुष्कळ आवडते; कारण तिथे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले येथेच असून स्वतः रामनाथी आश्रमातच सेवा करत आहे’, असा भाव ठेवल्यास रामनाथी आश्रमात जाण्याची आवश्यकता वाटणार नसणे

तेव्हा मी तिला म्हणालो, ‘‘तुझी सेवा इथे असते ना ? मग तू रामनाथीला जाऊन काय करणार ? परात्पर गुरु डॉ. आठवले येथेही आहेत. तू ‘रामनाथी आश्रमातच सेवा करत आहेस’, असा भाव ठेवलास, तर तुला रामनाथी आश्रमात जाण्याची आवश्यकताच भासणार नाही.’’

२. सेवेचे ठिकाण रामनाथी आश्रमाप्रमाणे केल्यास त्याचा सर्वांनाच लाभ होऊ शकणे आणि ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अधिक आवडणार असणे

श्री. रामानंद परब

परात्पर गुरु डॉक्टरांना ‘जेथे आपण सेवा करत आहोत, तेथील वातावरण रामनाथी आश्रमाप्रमाणे केले, तर ते अधिक आवडेल कि रामनाथीला आलेले आवडेल ? तू येथे सेवा करतांना या ठिकाणालाच रामनाथी आश्रमाप्रमाणे करण्याचा प्रयत्न केलास, तर त्याचा लाभ सर्वांनाच होईल. तू रामनाथी आश्रमात सेवेला गेल्यास तुला एकटीला लाभ होईल; पण तू या ठिकाणाला रामनाथी आश्रमाप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केलास, तर त्याचा लाभ समष्टीला होईल. तसे झाल्यास ते किती छान होईल ना !’’

मी सांगितलेले सूत्र ऐकून तिला पुष्कळ आनंद झाला. ती मला म्हणाली, ‘‘दादा, मी आतापासूनच तू सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करायला आरंभ करते.’’

३. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉक्टरांनीच ही सूत्रे माझ्या मुखातून बोलून घेतली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२२)