प्रत्येक वेळी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हिंदूंच्या प्रतीकांचा वापर का ? – राम कदम, आमदार, भाजप

  • ‘पठाण’ चित्रपटातील भगवे कपडे परिधान करून अश्‍लील ‘बेशरम रंग’ नावाचे गाणे चित्रीत केल्याचे प्रकरण

  • गाण्याविषयी निर्माते आणि दिग्दर्शक यांनी जनतेसमोर येऊन प्रतिक्रिया देण्याची मागणी

भाजपचे आमदार राम कदम

मुंबई – तुम्हाला कोट्यवधी रुपयांची प्रसिद्धी मिळवायची आहे. तुम्ही पुढे येऊन भूमिका का मांडत नाहीत ? तुम्ही घरात शांत बसून प्रसिद्धी मिळवता. निर्माते आणि दिग्दर्शक यांनी जनतेसमोर येऊन प्रतिक्रिया द्यावी. राजकारणाशी संबंध नसलेल्या साधू-संतांनी यावर आक्षेप घेतला आहे. भगवा हे त्यागाचे प्रतीक आहे. हा आमच्या ध्वजाचाही रंग आहे, हा रंग आमच्यासाठी पूजनीय असतांना तुम्ही त्याला ‘बेशरम रंग’ म्हणता ? प्रत्येक वेळी खालच्या दर्जाची प्रसिद्धी मिळवण्यासाठी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा वापर का केला जातो ?, असा प्रश्‍न भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना उपस्थित केला. महाराष्ट्रात हिंदुत्व मानणारे हिंदुत्ववादी शासन असल्याने हे महाराष्ट्रात चालणार नाही आणि आम्ही चालूही देणार नाही, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

‘पठाण’ या आगामी चित्रपटाचे एक अश्‍लील गाणे प्रसारित झाले आहे. त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी अंगावर भगव्या रंगाचे अल्प कपडे  घातले असून गाण्यात ‘बेशरम रंग’ असा उल्लेख आहे. अभिनेते शहारूख खान यांचाही या अश्‍लील गाण्यात सहभाग आहे.