राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी
संभाजीनगर, १४ डिसेंबर (वार्ता.) – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांच्याविषयी केलेल्या विटंबनात्मक वक्तव्याचा वारकरी संप्रदायाने निषेध केला आहे. त्यांची चौकशी करून देवता आणि संत यांच्याविषयी महाराष्ट्रात विडंबनाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांना याच कारणीभूत असण्याची दाट शक्यता आहे. सरकारने लवकरात लवकर कारवाई करून यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संभाजीनगर येथील युवा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. किरण महाराज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
सुषमा अंधारे यांच्या विटंबनात्मक वक्तव्यामुळे त्यांच्याविषयी वारकरी संप्रदायामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
१. आळंदी (जिल्हा पुणे) येथील वारकर्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत त्यांना चपलांचा हार घालून निषेध केला. येथील युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
२. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनीता आंधळे यांनीही वारकरी संप्रदायाच्या वतीने सुषमा अंधारे यांचा निषेध केला आहे.