‘मुलांच्या नावे संपत्ती करतांना मुलांकडून ‘म्हातारपणी तुमची काळजी घेईन’, असे लिहून घ्यावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला न्या. संजय कौल आणि ए.एस्. ओखा यांच्या खंडपिठाने पालकांना दिला. ‘असे लिहून न घेता पालकांनी संपत्ती हस्तांतरणाचा करार केला आणि मुलांनी पुढे त्यांच्या वृद्ध पालकांकडे दुर्लक्ष केले, तरी पालकांनी केलेला करार रहित होऊ शकत नाही’, असेही सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले.’ (९.१२.२०२२)