मुंबई – भारतीय पोलीस सेवेतील (आय्.पी.एस्.) महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या स्थानांतराचा आदेश शासनाकडून काढण्यात आला आहे. यामध्ये काही पोलीस अधिकार्यांना पदोन्नती मिळाली आहे. मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांचे स्थानांतर आतंकवादविरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालकपदी करण्यात आले आहे. बृहन्मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांचे स्थानांतर नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी झाले. वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन यांची अपर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली. विनय कुमार चौबे यांचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी स्थानांतर झाले.