हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकजूट करण्याचा परशुरामभूमी चिपळूण येथील हिंदुत्वनिष्ठांचा वज्रनिर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनाभूमीत भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

चिपळूण, १० डिसेंबर (वार्ता.) – भारतातील २८ राज्यांत हिंदु धर्मरक्षण करण्यासाठी कार्यरत असणार्‍या हिंदु जनजागृती समितीची स्थापना चिपळूण येथे झाली. या परशुरामभूमीत हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकजूट करण्याचा वज्रनिर्धार, ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्याचा निमित्ताने झालेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी केला.

बैठकीत संबोधित करतांना श्री. मनोज खाडये

येथील ब्राह्मण साहाय्यक संघ सभागृहात ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदुत्वनिष्ठांची बैठक झाली. या बैठकीत हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आयोजनानिमित्त चर्चा करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आवश्यकतेविषयी उपस्थितांना संबोधित केले. जिहादी आक्रमण, हलाल जिहाद, लव्ह जिहाद, धर्मांतर, वक्फ बोर्ड कायद्याचे षड्यंत्र अशा विविध जिहादांमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे वास्तव सर्व हिंदूंपर्यंत पोचवणे आवश्यक असून यासाठीच सोमवार, २६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता येथील जुना कालभैरव मंदिराशेजारील नव्या पटांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. मनोज खाड्ये यांनी या वेळी दिली. या बैठकीला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या बैठकीचे सूत्रसंचलन समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले.

बैठकीला उपस्थित असलेले हिंदुत्वनिष्ठ

या बैठकीला वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. अविनाश महाराज आंब्रे, ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, ओझरवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक घेवडेकर, निर्बाडे देवस्थानचे श्री. गोविंदराव महाडिक, भाजप शहराध्यक्ष श्री. आशिष खातू, युवा सेना शहरप्रमुख (शिंदे गट) श्री. निहार कोवळे, विश्‍व हिंदु परिषदेचे सर्वश्री पराग ओक आणि उदय सलागरे, चिपळूण व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. वासुदेव भांबुरे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) श्री. नरेश कृष्णा राणे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. वैशाली मनोज शिंदे, माहेश्‍वरी समाजाच्या सौ. नीता लढ्ढा आदी १२० हून अधिक धर्मनिष्ठ हिंदू उपस्थित होते.

अशाच प्रकारे सावर्डे आणि लोटे येथेही समितीकडून घेतलेल्या बैठकांमध्ये अनेक धर्मप्रेमींची उपस्थिती होती.