८ वर्षांपासून पुण्यात तस्करी करणार्‍या नायजेरियन नागरिकाकडून २ कोटी रुपयांचे ‘कोकेन’ जप्त !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – ‘कोकेन’ या अमली पदार्थाची विक्री करणार्‍या फॉलरिन अब्दुल अंडोई या नायजेरियन नागरिकास अमली पदार्थविरोधी पथकाने उंड्री येथून अटक केली आहे. त्याच्याकडून १ किलो ८१ ग्रॅम ‘कोकेन’सह २ कोटी २० लाख रुपयांचा ऐवज शासनाधीन करण्यात आला. त्याच्या विरोधोत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. फॉलरिन हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ‘कोकेन’ विक्री करतांना त्याला अटक केली होती. हा आरोपी वर्ष २००० पासून भारतामध्ये रहात आहे. वर्ष २०१४ मध्ये प्रथम तस्करी प्रकरणी अटक केल्यानंतर त्याचा ‘व्हिसा’ आणि ‘पारपत्र’ रहित केले होते. (वर्ष २०१४ मध्ये केवळ एवढीच कारवाई करून का थांबण्यात आले ? त्याला भारताबाहेर का पाठवण्यात आले नाही ? – संपादक) तेव्हापासून तो भारतात अनधिकृतपणे लपून ‘कोकेन’ विक्री करत होता, असे पोलिसांनी सांगितले.