ह.भ.प. (सौ.) ऋतुजा जोशी, परभणी
१. आश्रम पहाणे : ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला साक्षात् भगवंताच्या द्वारका नगरीत आल्यासारखे वाटले. ‘श्रीकृष्णाला प्रत्यक्ष पाहिले’, असे मला जाणवले.
२. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पहाणे : नकारात्मक शक्ती सकारात्मक शक्तीला त्रास देतात आणि त्या दैवी कार्यात अडथळे आणतात. हे सर्व पाहून ‘आपल्या संतांनी किती सहन केले’, असे मला वाटले.’ (२.१०.२०२२)
श्री. वसंत ज. जोशी, नागपूर
१. आश्रम पहाणे : ‘आश्रम पाहून मला एक वेगळीच अनुभूती आली. दैवी शक्तीचा मानवी जीवनावरचा प्रभाव, तसेच मनाची सकारात्मक आणि नकारात्मक स्थिती यांविषयीची मला माहिती मिळाली.
२ आ. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पहाणे : चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचा मानवी जीवनावर होणारा परिणाम माझ्या लक्षात आला. (१२.१०.२०२२)
|