‘सप्टेंबर १९७२ ला भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद म्हणजेच स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद (‘इस्कॉन’ अर्थात् आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ याचे संस्थापक) यांचे नैरोबी विद्यापिठात एक व्याख्यान झाले. त्यात त्यांनी केनिया या विकसनशील देशाच्या नागरिकांना खालील संदेश दिला, ‘‘कृपा करून आध्यात्मिक विकास करा; कारण हाच खरा विकास होय. कुत्र्या-मांजरासारखे रहात असणार्या अमेरिकन-युरोपियन लोकांची नक्कल करू नका. अण्वस्त्रे निर्माण झालेलीच आहेत आणि पुढचे युद्ध चालू होताच त्यांच्या गगनचुंबी इमारती अन् इतर सर्व काही बेचिराख होणार आहे.’’
(साभार : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)