सर्वोच्च न्यायालयाच्या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे प्रकाशन

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे प्रकाशन येथे करण्यात आले. या ‘अ‍ॅप’द्वारे केंद्रीय मंत्रालयांच्या विभागीय अधिकार्‍यांकडून करण्यात येणारी न्यायालयीन कार्यवाही ‘ऑनलाईन’ पहाता येणार आहे. हे ‘अ‍ॅप’ ‘गूगल प्ले स्टोअर’मधून ‘डाऊनलोड’ करता येऊ शकते. पुढील आठवड्यात याची ‘आय.ओ.एस्.’ या प्रणालीवरील आवृत्ती येणार आहे.