५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सिंदी, जिल्हा वर्धा येथील कु. युक्तेश्वरी सुनील गवळी (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी !  कु. युक्तेश्वरी सुनील गवळी ही या पिढीतील एक आहे !

कु. युक्तेश्वरी गवळी

‘सिंदी, जिल्हा वर्धा येथील कु. युक्तेश्वरी सुनील गवळी हिची आई आणि मावशी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. आठवले

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले 

१. सौ. प्रज्ञा सुनील गवळी (कु. युक्तेश्वरीची आई)

सौ. प्रज्ञा गवळी

१ अ. आईला कचरा मार्गावर न टाकता कचरापेटीत टाकण्याची जाणीव करून देणे : ‘एकदा मी वर्धा येथून सिंदी येथे येत असतांना मार्गावर एक कागद फेकला. तेव्हा ती म्हणाली, ‘‘आई, मार्ग देवाचा आहे. त्यावर आपण कचरा टाकायचा नाही. तो कचरा पेटीत टाकला पाहिजे.’’

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव  

१. युक्तेश्वरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची पूजा करून त्यांना फुले अर्पण करते. ती म्हणते, ‘‘ते आपल्या घरी आहेत; म्हणून आपल्याला कोरोना झाला नाही.’’

२. ‘आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच अन्न-पाणी मिळते’, असा तिचा भाव असतो.

३. खेळतांना पडली, तर ती म्हणते, ‘‘मला प.पू. डॉक्टरांनीच वाचवले.’’

४. एक दिवस मी तिला झोपेतून उठवले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला झोपेतून कशाला उठवलेस ? मी प.पू. डॉक्टरांच्या चरणांजवळ झोपले होते. ते मला आशीर्वाद देत होते. मला आश्रमात जायचे आहे. मला आश्रमात कोण नेईल ?’’

२. सौ. सुनंदा हरणे, वर्धा (कु. युक्तेश्वरीची मावशी)

२ अ. ‘युक्तेश्वरी म्हणते, ‘‘अभ्यास करत असतांना माझा दोन घंटे नामजप होतो.’’

२ आ. तिच्या घराजवळ एक ४ वर्षांची मुलगी आहे. युक्तेश्वरी तिच्याकडून नामजप करवून घेते.

२ इ. क्षात्रभाव : ती तिचे आई-वडील आणि भाऊ यांना योग्य दृष्टीकोन देते. तिच्या आईने एखाद्या दिवशी चुका लिहिल्या नाहीत, तर ती आईला चुका लिहिण्याची आठवण करून देते.

२ ई. चुकांविषयी गांभीर्य

१. ती व्यष्टी साधनेचा आढावा देते. तेव्हा तिच्याकडून चूक झाली असेल, तर प्रायश्चित्त घेते.

२. युक्तेश्वरी तिची आई, बाबा आणि भाऊ यांना त्यांच्याकडून होणार्‍या चुकीमागील स्वभावदोष सांगून साहाय्य करते. त्यामुळे तिच्या घरामध्ये पुष्कळ पालट झाल्याचे जाणवते.

२ उ. वाक्चातुर्य : तिचे तिच्या कुत्र्यावर पुष्कळ प्रेम आहे. एक दिवस तिला त्याची पुष्कळ आठवण येत होती. तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘कुत्र्यावर एवढे प्रेम करण्यापेक्षा देवावर करावे.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘कुत्र्यातही देव आहे. तो दत्तगुरूंच्या जवळ असतो.’’

२ ऊ. शालेय शिक्षणापेक्षा अध्यात्मात प्रगती करण्याची इच्छा असणे : एकदा ती शाळेतून आल्यावर मी तिला विचारले, ‘‘पेपर कसा गेला ? तू डॉक्टर होणार, शिक्षक होणार कि काय होणार ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रमाणे अध्यात्मात प्रगती करायची आहे.’’

२ ए. भाव

२ ए १. ती स्वयंपाक झाल्यावर मला आधी देवाला नैवेद्य दाखवण्याची आठवण करून देते. तसेच जेवतांना आणि अल्पाहाराच्या वेळी ती सर्वांना प्रार्थनेची आठवण करून देते.

२ ए २. परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : युक्तेश्वरी शाळेत जात असतांना मी तिला विचारले, ‘‘तुझ्या समवेत परात्पर गुरु डॉक्टर असतात का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘हो. त्यांनी कधी श्रीराम, कधी श्रीकृष्ण, तर कधी श्रीविष्णु यांचे कपडे घातलेले असतात आणि ते सूक्ष्मातून माझ्याजवळच असतात.’’

३. कु. युक्तेश्वरीचे स्वभावदोष

‘सवलत घेणे, मनाने करणे आणि हट्ट करणे.’ – सौ. प्रज्ञा सुनील गवळी, सिंदी (रेल्वे), जि. वर्धा

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक