गुरुमंत्राचे महत्त्व लक्षात न घेता गुरूंच्या देहाच्या नावात अडकणारे शिष्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात. हा नामजप त्या साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक/पूरक असतो, तसेच त्या जपामागे गुरूंचा संकल्पही कार्यरत असतो. गुरुमंत्राचे इतके अनन्यसाधारण महत्त्व असतांना बहुतेक शिष्य गुरुमंत्राकडे दुर्लक्ष करून गुरूंचेच नाव घेतांना दिसतात. यातून त्या शिष्यांची प्रगती होण्याची गती न्यून होतेच, तसेच ते गुरूंच्या सगुण रूपात अडकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुरूंनी त्या गुरुमंत्रासाठी केलेला संकल्प व्यर्थ जातो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.९.२०२१)