महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ ८ डिसेंबरला पिंपरी-चिंचवड येथे बंदचे आवाहन !

पिंपरी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यभरातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुष यांच्या अवमानाच्या निषेधार्थ सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी पिंपरी-चिंचवड येथे बंदचा निर्णय घेतला आहे, असे सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी सांगितले. व्यापारी, हातगाडीवाले, आधुनिक वैद्य, अधिवक्ता यांसह विविध संघटनांची चर्चा चालू असून शिवभक्त, फुले, शाहू, आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांच्या अनुयायांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मारुति भापकर यांनी केले.