नवापूर येथे पकडलेले ५ धर्मांध दरोडेखोर पोलीस ठाण्यात खिडकीचे गज कापून पसार झाले !

एका धर्मांध दरोडेखोराला अटक !

नवापूर (जिल्हा संभाजीनगर) – ४ डिसेंबरच्या रात्री १.३० वाजता येथे दरोड्याच्या सिद्धतेत असलेल्या ५ धर्मांध दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही वेळातच ५ दरोडेखोरांनी नवापूर पोलीस ठाण्यातील खिडकीचे गज कापून पोबारा केला. यातील एका दरोडेखोराला पोलिसांनी पकडले आहे. इरफान इब्राहिम पठाण युसूफ आसिफ पठाण, गौसखाँ हनीफखाँ पठाण, अकीलखाँ इस्माईलखाँ पठाण, अशी आरोपींचे नावे आहेत. काही लोकांनी आरोपी शेतात लपल्याचे सांगितल्यावर नंदुरबार पोलिसांनी शोध मोहीम चालू केली आहे. यात गुजरात पोलिसांनी हैदर उपाख्य इस्माईल पठाण या आरोपीला माणिकपूर जवळ पकडले आहे. अटक करण्यात आलेले ५ धर्मांध संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत.

संपादकीय भूमिका 

दरोडेखोर काही वेळातच पोलीस ठाण्यातून खिडकीचे गज कापून पळून कसे काय जाऊ शकतात ? कि त्यांना पळून जाण्यास साहाय्य केले ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? या वेळी कर्तव्यावर असणार्‍या पोलिसांना कठोर शिक्षा द्यायला हवी !