मुसलमान महिलांनी दोनच अपत्यांना जन्म द्यावा ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे आवाहन

आसामचे आमदार मौलाना बदरुद्दीन यांनी हिंदूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण

हिमंत बिस्व सरमा आणि बदरुद्दीन अजमल

गौहत्ती (आसाम) – महिला या मुलांना जन्माला घालण्याचा कारखाना नाहीत. ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष आणि आमदार बद्रुद्दीन अजमल हे एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे मुसलमान महिलांनी दोनच अपत्यांना जन्म द्यावा, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले. बदरुद्दीन अजमल यांनी काही दिवसांपूर्वी ‘हिंदू लग्नाच्या पूर्वीच अवैधपणेच २-३ बायका ठेवतात. ते मुलांना जन्म देत नाहीत. केवळ स्वतः सुख उपभोगतात आणि पैसे वाचवतात’, असे अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री सरमा बोलत होते.

सरमा पुढे म्हणाले, ‘‘एकाच महिलेने अनेक अपत्यांना जन्म दिला, तर त्याचा परिणाम तिच्या शारीरिक स्थितीवर होऊ शकतो. त्याचे सामाजिक परिणामही होऊन राज्याची हानी होईल. महिलांनी २ पेक्षा अधिक मुलांना जन्म दिला, तर ती मोठी होईपर्यंत त्यांचा खर्च आणि सांभाळ बदरुद्दीन अजमल यांनी करावा.’’

संपादकीय भूमिका

मुख्यमंत्र्यांनी आणि त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर मार्गानेच उपाययोजना आखावी, असेच हिंदूंना वाटते !