१. यजमान दैवी प्रवासासाठी जातांना ‘ते आश्रमात आल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सांगतील’, याचा आनंद होणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ महर्षींच्या आज्ञेनुसार दैवी प्रवासासाठी असतात. त्या वेळी त्यांच्या समवेत माझ्या यजमानांना (श्री. वाल्मिक यांना) जाण्याची संधी मिळाली. ते दैवी प्रवासासाठी गेल्यावर ‘आश्रमात परत कधी येणार ?’, हे निश्चित नसते. देवाने माझ्या मनाची सिद्धता करवून घेतली, ‘आता वाल्मिक दौर्यावर जात आहेत. ते किती मासांनी परत भेटतील, हे ठाऊक नाही.’ ‘देवाच्या कृपेने यजमान श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत जाणार आहेत. यजमान आश्रमात आल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मला सांगतील’, याचा मला पुष्कळ आनंद होत होता.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा लाभलेला सत्संग !
२ अ. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुटुंबियांचे कौतुक करून ‘हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी कुणालातरी त्याग करावाच लागणार आहे’, असे सांगणे : एकदा मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा त्या माझे आणि आमच्या कुटुंबियांचे कौतुक करत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही काही न म्हणता श्री. वाल्मिक यांना पाठवले. त्यामुळे आम्हाला इकडे साहाय्य झाले. सध्या मुली नवर्याला सोडून रहात नाहीत. त्यांना त्यांच्या समवेत नवरा हवा असतो. रोहिणीचे कौतुक आहे ना ! हिंदु राष्ट्र आणण्यासाठी या मुलींचा त्याग आहे. या वयाने लहान आहेत, तरीही त्या त्याग करतात. हिंदु राष्ट्र येण्यासाठी कुणालातरी त्याग करावाच लागेल. आपल्याला ती एक मोठी संधी आहे.’’
२ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे बोलणे ऐकून ‘कोणातही न अडकता साधना करणे महत्त्वाचे आहे’, असे वाटणे : त्यांचे बोलणे ऐकून मला वाटले, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितलेले किती महत्त्वपूर्ण आहे ! ते लक्षात घेऊन सर्वांनी जोमाने साधना करूया. कोणातही अडकून न रहाता श्रद्धेने साधना करूया. साधनेसाठी आपल्याला आई-बाबा आणि पती यांपासून दूर रहायची वेळ आली, तरीही तो एक मोठा त्याग आहे. ती साधनेसाठी एक मोठी संधी आहे’, हे लक्षात घेऊया.’
३. यजमान आश्रमात परत आल्यावर त्यांना ७ दिवसांनीच दौर्यावर जावे लागल्यानंतर ‘गुरुसेवेसाठी आपण तत्पर असले पाहिजे’, असा विचार मनात येणे
यजमान साडेपाच मासांनी ३.१०.२०२१ या दिवशी दैवी दौर्याहून आश्रमात आले. त्या वेळी त्यांचे १५ दिवस आश्रमात रहाण्याचे नियोजन होते; पण अकस्मात् एक सेवा आल्यामुळे त्यांना १०.१०.२०२१ या दिवशी संध्याकाळी निरोप आला, ‘पहाटे निघावे लागेल. प्रवासाच्या साहित्याची ‘बॅग’ भरून ठेवा.’ त्या वेळी मला ती परिस्थिती स्थिर राहून स्वीकारता आली. ‘गुरुसेवेसाठी आपण तत्पर असले पाहिजे’, असा एकच विचार त्या वेळी माझ्या मनात होता. त्यामुळे मला आनंद घेता आला.’
– सौ. रोहिणी वाल्मिक भुकन (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०२१)