|
उदयपूर (राजस्थान) – ‘प्लॅस्टिक कचरा द्या आणि विनामूल्य चहा प्या’ अशा प्रकारे येथे एक चहा टपरी चालवणार्या भग्गासिंह यांनी लोकांना आवाहन केले आहे. प्लास्टिकच्या कचर्याची समस्या दूर व्हावी, तसेच परिसर स्वच्छ रहावा, यासाठी केलवाडा येथील भग्गासिंह या युवकाने ही मोहीम हाती घेतली आहे. सामाजिक माध्यमांतून या टपरीची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. स्थानिक नागरिक त्यांच्या परिसरातील कचरा गोळा करून भग्गासिंह यांच्या टपरीवर जमा करतांना यात दिसत आहेत. ‘स्वच्छ भारत’ या केंद्रशासनाची मोहीम राबवणार्या अधिकार्यांनीही या उपक्रमाची नोंद घेतली आहे.
क्रिकेटर रवि विश्नोई ने दिया चाय के बदले कचरा: योजना की शुरुआत; कचरा लेकर पहुंचे भग्गा सिंह की टी-स्टॉल पर https://t.co/Aoiec1vkZ7
— Newshindi247 (@Newshindi2471) December 1, 2022
संपादकीय भूमिकाभग्गासिंह यांच्यासारख्या संवेदनशील नागरिकांकडून घेतला जाणारा पुढाकार अभिनंदनास पात्र आहेच, परंतु त्यासह जनतेच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार करू न शकणारे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद आहे, हेही तितकेच खरे ! |