‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वापरा आणि फेका (Use and Throw)’ ही जी पाश्‍चात्त्यांची आधुनिक संस्कृती आहे, ती आता अनेक तरुणांंनीही आत्मसात केली आहे. त्यामुळे ज्या आई-वडिलांनी जन्म दिला, जन्मापासून स्वावलंबी होईपर्यंत सर्व तर्‍हेने काळजी घेतली, उदा. आजारपणात सर्व केले, शिक्षण दिले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता न वाटता हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ या पाश्‍चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याचे पाप त्यांना जन्मोजन्मी भोगावेच लागणार आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले